Principal's Desk

‘प्रज्वालितो दीप इव प्रदीपात’


        प्रस्तुत महाविद्यालय वाई, जिल्हा सातारा येथून 15 जून 1968 या वर्षी नांदेड,जि. नांदेड व येथे स्थलांतरित झाले असून महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या नियंत्रणा नुसार व संलग्नतेनुसार कार्यरत आहे.
         तज्ञ व शैक्षणिक जाण असणारे प्राचार्य व प्राध्यापक वृदांमुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण समृद्ध असून हीच आमची यशाची गुरुकिल्ली आहे. गत 54 वर्षाच्या कालावधीत महाविद्यालयातून सेवापूर्व व सेवांतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांची संख्या जवळपास 10,000 असून ते शिक्षक शिक्षण क्षेत्रात उच्च पदांवर तसेच प्रशासकीय सेवेत यशस्वीपणे कार्यरत आहेत. अनेक शिक्षक स्थानिक, राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.
         महाविद्यालयात नियमित बी.एड., एम.एड, संशोधन केंद्र या बरोबरच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे सुट्टीतील बी.एड. अभ्यासक्रम कार्यरत आहे. प्रशिक्षणार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व भावी जीवन यशस्वी जगण्यासाठी वर्षभरात अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रात्यक्षिक कार्य महाविद्यालयात घेतले जातात. दरवर्षी महाविद्यालयाच्या निकालाची यशस्वी परंपरा प्रशिक्षणार्थ्यांना पुढे नेत आहे.
         महाविद्यालयात प्रशिक्षणार्थ्यांचा विविध अंगानी विकास व्हावा याकरीता सुसज्य ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान-गणित प्रयोगशाळा, सामाजिक शास्त्र प्रयोगशाळा ई. उपलब्ध आहे. महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थीं बरोबरच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील गरजू व्यक्ती या ग्रंथालयाचा व प्रयोगशाळेचा उपयोग करतात.
         महाविद्यालयाचे नॅक हे शै.वर्ष 2014-15 ला झाले असून महाविद्याल पुढील नॅक करण्याच्या दृष्टीने कार्यरत आहे, महाविद्यालयाचे शैक्षणिक व इतर विकासाचे आय.क्यू.ए.सी. प्रमाणे चालू असते.
         एकूणच ‘प्रज्वालितो दीप इव प्रदीपात’ या ध्येयाप्रमाणे प्रशिक्षणार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशिक्षणार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता महाविद्यालय सतत कार्यरत असते.
        

डॉ उर्मिला मुरलीधर धूत
प्राचार्य,
शासकीय अध्यापक महाविद्यालय,
नांदेड.